
पुणे : समलिंगी असल्याचे भासवून मैत्री करायची. भेट ठरवायची आणि पहिल्याच भेटीत थेट लूट करण्याचे गैरप्रकार वाढत आहेत. त्यासाठी ‘डेटिंग अॅप’चा सर्रास गैरवापर केला जातो. पुण्यातील शुभमने (नाव बदलले आहे) ‘एलजीबीटीक्यू’ समुदायातील एका ‘डेटिंग अॅप’वर एकाशी संवाद साधला. अधिक ओळखीनंतर त्याने भेट निश्चित केली. नंतर काय घडणार याची त्याला तरी काय कल्पना असणार...