शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : दत्ता बहिरट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

खडकी : शिवाजीनगर मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावणार असून लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यापूर्ण करण्यासाठी विधानसभेत जाणार, असा निर्धार शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता बहिरट यांनी आज व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सहयोगी पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 7 मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सुरवात मुळारस्ता येथून करण्यात आली.

त्यावेळी बहिरट यांनी ''जनतेच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार'' असे सकाळशी बोलताना सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. ही यात्रा वाकडेवाडीतील नागरीवस्ती तसेच पाटील इस्टेटवरुन शेवटी भोसले वाडीला संपली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datta Bahirat will solve many questions of Shivajinagar constituency in Maharashtra vidhan sabha 2019