esakal | दोन्ही कारखान्यांत शेतकरी, कामगार वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

harshwadhan patil dattamama bharane

दोन्ही कारखान्यांत शेतकरी, कामगार वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नीरा नरसिंहपूर : स्वतःला सहकाराचे तज्ञ म्हणवणाऱ्यांनी आपल्या दोन्ही कारखान्यांत सर्वसामान्य शेतकरी, कामगारांना हक्कापासून वंचित ठेवले, अशी टीका सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. माळेगाव व छत्रपती कारखान्यावर शेतकऱ्यांना साध्या अर्जावर सभासद केले जाते, याला सहकार म्हणतात, असेही भरणे यांनी यावेळी नमूद केले.

पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेचे स्थलांतर तसेच पिंपरी बु विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष, सचिव यांचा सत्कार व विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात होते. यावेळी कल्याण आखाडे, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, नवनाथ रूपनवर, अतुल झगडे, अभिजित रणवरे, सुरेश शिंदे, विजय शिंदे, अभिजित तांबिले, हामा पाटील, शुभम रणवरे, सचिन खामगळ, सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, उपसरपंच अनुराधा गायकवाड, नागेश गायकवाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, विभागीय अधिकारी आनंद थोरात, इनुस शेख, ज्ञानेश्वर घोगरे, दत्तात्रेय तोरसकर, दत्तात्रेय घोगरे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणारे एकाही रस्त्याचे काम आगामी काळात शिल्लक राहणार नाही. त्यासाठी आठशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे रस्तेही बांधकाम खात्याच्या माध्यमातून करण्यात येतील. तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्यामुळेच झाली असून त्यांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद मालक असून त्यांच्या जिवावर अकरा हजार पाचशे कोटींच्या ठेवी असून तेवढेच कर्ज वाटप केले आहे. बँकेने सचिवांची केडर स्थापन करून पन्नास कोटींची ठेव बँकेत करण्याचा देशातील बहुधा एकमेव प्रयोग आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नीलेश धापटे व महेश सुतार यांनी केले तर आभार सुदर्शन बोडके यांनी मानले.

loading image
go to top