राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatray and Appasaheb
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध

वालचंदनगर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये (Pune District bank Election) राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) व जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अंतीम क्षणाला माघारी घेतल्यामुळे भरणे व जगदाळे यांची संचालकपदी (Director) बिनविरोध वर्णी लागली आहे.

जिल्हाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीला राज्यामध्ये महत्व आहे. २ जानेवारी रोजी जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार आज बुधवार (ता. २२) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख होती. जिल्हातून ‘ब’ वर्गासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व इंदापूर तालुक्यातून अ वर्गातून संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. भरणे यांच्या विरोधामध्ये ‘ब’ वर्गातून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील तीन अर्ज यापूर्वी माघारी घेण्यात आले होते. जगदाळे व हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या रावसाहेब कोकाटे यांनी ‘ब’ वर्गातून भरणे यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नव्हता. तसेच जगदाळे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या भाऊसाहेब सपकळ व सणसरच्या ॲड. रणजित निंबाळकर यांना उमेदवारी अर्ज भरले होते.

यातील सपकळ यांनी यापूर्वीच निवडणूक अर्ज माघारी घेतला होता. निंबाळकर यांचा अर्ज माघारी घेतला नव्हता. ‘ब’ वर्गामध्ये भरणे व ‘अ’ वर्गात जगदाळे यांचे पारडे जड होते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये जगदाळे यांनी भरणे यांची साथ सोडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साथ दिल्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष जगदाळे यांच्या विरोधामध्ये काय भूमिका घेणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले होते. तसेच कोकाटे यांच्या अर्जामुळे ब गटातील निवडणूक बिनविरोध होणार नव्हती.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने जगदाळे यांच्या विरोधातील निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज व भरणे यांच्या विरोधातील कोकाटे यांचे उमेदवारी अर्ज आज (ता. २२) रोजी माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरणे व जगदाळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड होणार आहे.

तालुक्यातील मतदारांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास...

इंदापूर तालुक्यामध्ये ‘अ’ वर्गामध्ये सुमारे १८३ नागरिकांचे मतदान आहे. आप्पासाहेब जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे तालुक्यात निवडणूक होणार होती. जगदाळे यांचे पारडे जड असतानाही मतदारांना कुणाला मतदान करायचे असा पेच निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे मतदारांनी सुटकेचा निश्‍वास: सोडला.