इंदापूर तालुक्यात आज अखेर आढळले १४०० हून जास्त रुग्ण; आमदार भरणे यांच्या प्रशासनाला सूचना

डॉ. संदेश शहा
Saturday, 12 September 2020

इंदापूर शहर व तालुक्यात आजअखेर 1455 कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामहामारी वर मात करण्यासाठी 106 पथके कार्यरत आहेत. इंदापूर पंचायत समिती,नगरपरिषद, महसूल विभाग तसेच शिक्षकांच्या पथकांनी इंदापूर शहरात नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले असून, त्यास नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात जी गावे कोरोना हॉट स्पॉट म्हणून ओळखली जातात, तिथे सुद्धा लवकरच सर्वेक्षण सुरू करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर - इंदापूर शहर व तालुक्यात आजअखेर 1455 कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामहामारी वर मात करण्यासाठी 106 पथके कार्यरत आहेत. इंदापूर पंचायत समिती,नगरपरिषद, महसूल विभाग तसेच शिक्षकांच्या पथकांनी इंदापूर शहरात नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले असून, त्यास नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात जी गावे कोरोना हॉट स्पॉट म्हणून ओळखली जातात, तिथे सुद्धा लवकरच सर्वेक्षण सुरू करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तहसिलदार सोनाली मेटकरी, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्या समवेत शहरातील इंदापूर नगरपरिषद, तेली गल्ली, भारती टॉवर, सोनाई नगर परिसरात नागरिक, कोरोना रुग्ण नातेवाईक यांच्या गाठीभेटी घेवून सर्वेक्षणाची माहिती घेतली. इंदापूर महाविद्यालयातील कोरोना केअर सेंटर ची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

राज्य मंत्री भरणे पुढे म्हणाले, कोरोना हा जीवघेणा आजार नाही मात्र या आजारापासून जेष्ठ नागरिकांना जपले पाहिजे. आपल्या घरी सर्व्हेसाठी येणाऱ्या माणसांना सहकार्य करा तसेच आपला आजार देखील लपवू नका. सर्वेमधील संशयित रुग्णांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येणार असून ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, काळजी करू नका मात्र योग्यकाळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर बँकेचे अध्यक्ष भरत शहा, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, नगरसेवक अमर गाडे, पोपट शिंदे व दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, राहुल गुंडेकर उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatraya Bharane met the Corona patient and his relatives and got information