इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्तात्रय फडतरे

डाॅ. संदेश शहा
Thursday, 21 January 2021

इंदापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वालचंदनगर (कळंब, ता. इंदापूर जि. पुणे ) येथील उद्योजक दत्तात्रय सखाराम फडतरे यांची बिनविरोध निवड झाली.

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य तसेच देश पातळीवर मत्स्य बाजारामुळे प्रसिद्ध इंदापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वालचंदनगर (कळंब, ता. इंदापूर जि. पुणे ) येथील उद्योजक दत्तात्रय सखाराम फडतरे यांची बिनविरोध निवड झाली.

सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी राजीनामा दिल्यामुळे इंदापूर बाजार समितीचे सभापतीपद रिक्त झाले होते. त्यामुळे गुरुवार (ता. २१ जानेवारी रोजी) बाजार समिती कार्यालयात सभापती पदासाठी निवडणुक निर्णयअधिकारी तथा सहाय्यक निबंधक जे. पी. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली.

सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

दरम्यान, या बैठकीमध्ये दत्तात्रय फडतरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी मावळते सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती तथा आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी बाजार समितीच्या माध्यमातून राबविलेल्या शेतकरीभिमुख योजना व उपक्रमाबद्दल त्यांचा तसेच नवनिर्वाचित सभापती दत्तात्रय फडतरे यांचा संचालक मंडळाने सत्कार केला.

यावेळी फडतरे म्हणाले, ''आगामी काळात आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने व संचालक मंडळाच्या सहकार्याने बाजार समितीचे कामकाज करून समितीच्या नावलौकिकात भर घातली जाईल.'' 

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण​

यावेळी आमदार यशवंत माने, मधुकर भरणे, संतोष वाबळे, दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे, संग्रामसिंह निंबाळकर, अनिल बागल, गणेशकुमार झगडे, निर्मला अंकुश रणमोडे, स्वाती भाऊसाहेब सपकळ, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, सुभाष दिवसे, मेघ:शाम पाटील, महावीर गांधी, भानुदास सपकळ उपस्थित होते. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatraya Phadtare as the Chairman of Indapur Agricultural Produce Market Committee