दत्तात्रय तुपे हे शेती, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणारे व्यक्तीमत्व : शरद पवार

राष्ट्रसेवा दलाच्याशिकवणीमुळे ते गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे ओढले गेले.
sharad pawar
sharad pawarsakal

हडपसर : शेती,(farming) सहकार(co-operative) आणि सामाजिक(social) क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या, काळाच्या ओघात आणि विकासाच्या प्रक्रीयेत शेतीशिवाय अन्य उद्योग-व्यवसायात पुढारलेल्या हडपसरभागातील काही मंडळींशी आजही माझा स्नेह आहे. त्यामध्ये नव्या पीढीसमोर आदर्श ठेवणाऱ्या जुन्या पिढीतील दत्ताभाऊ तुपे(dattatray tupe) यांचा आवर्जून उल्लेख येतो. "भाऊ' ही त्यांची जीवनगाथा नवतरूणांना मार्गदर्शक ठरेल, असे गौरवौद्गार खासदार शरद पवार(sharad pawar) यांनी काढले.भूविकास बँक व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दत्तात्रय तुपे यांच्या "भाऊ' या व्यक्तीचरित्राचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी तुपे यांच्या कार्याचा गौरव करताना ते बोलत होते. (Dattatraya Tupe is a person who works faithfully in agriculture, co-operation and social sector syas Sharad Pawar)

साधना बँकेचे संचालक व हडपसर भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, आमदार चेतन तुपे, पुस्तकाचे लेखक नारायण ढमे, प्रमोद तुपे, अमर तुपे, विकास तुपे, अमेय तुपे, निखिल तुपे, युवराज शेवाळे, जयप्रकाश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, "दत्तात्रय तुपे यांना सर्वजण प्रेमाने 'भाऊ' म्हणतात. त्यांना शेती, सहकाराचा दांडगा अनुभव आहे. ते एक प्रामाणिक, मितभाषी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भाऊंच्या मनामध्ये देशप्रेमाची प्रचंड धग आहे. राष्ट्रसेवा दलाच्याशिकवणीमुळे ते गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे ओढले गेले. मी सुरू केलेल्या शेतकरी दिंडीतही ते सहभागी झाले होते. शेती हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी शेतीतील उत्पादनवाढीचे नवनवीन प्रयोग अंगीकारले; यशवंत सहकारी साखर कारखाना व पणन संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ते सतत झटत राहिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com