दौंड : शहरातील रेल्वे वसाहतीतील बंद खोलीत आढळलेल्या ७० वर्षीय महिलेच्या शिरविरहित मृतदेहाच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. मृत महिलेच्या शिराचा अद्याप शोध लागलेला नाही..दौंड पोलिसांनी याबाबत माहिती दिली. शहरातील नगर मोरी चौकाजवळ रेल्वेची ‘आरबी-वन’ ही जुनी वसाहत आहे. या वसाहतीमधील एका पडक्या खोलीतून १९ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे व खोलीत राहणार्या वयोवृध्द महिला दिसत नसल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत दौंड पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. बंद खोलीची पाहणी केली असता तेथे रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाला शिर नसल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले..मृत महिलेची ओळख सुमन किसन शिंदे (वय ७०) अशी पटली असून त्या या पडक्या खोलीत एकट्याच राहत होत्या. परिसरातील नागरिकांनी सुमन शिंदे यांना १६ ऑगस्ट रोजी अखेरचे पाहिले होते. दौंड पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्काळ तपास सुरू केला..दरम्यान याप्रकरणी सुमन किसन शिंदे यांची मुलगी तृप्ती हिरवे (रा. शिरूर, जि. पुणे) यांनी बुधवारी रात्री दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने सुमन शिंदे यांचा शिरच्छेद करून खून करण्यात आला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे शिर अन्यत्र नेऊन टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) ( खून करणे) व कलम २३८ ( अपराध्याला वाचविण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दौंड पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त तपास करून विक्रम ऊर्फ विकी धनराज आल्हाट (वय २६, रा. समतानगर, दौंड ) आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण (वय २२, रा. आरबी-वन वसाहत, नगर मोरी, दौंड) या संशियत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. शिर कापून खून करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पुढील तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.