

Daund Court Employees Begin Indefinite Strike Over Equal Pay Demand
esakal
दौंड : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनाही ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे, या मागणीसाठी दौंड न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात दौंडमधील न्यायालयीन कर्मचारी १७ नोव्हेंबर रोजी सहभागी झाले. न्यायालयासमोर त्यांनी संपाला सुरुवात केली. यापूर्वी १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शांततामय पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. न्यायालयीन कर्मचारी संघटना (गट क), बेलीफ संघटना, स्टेनो संघटना आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या चारही संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.