

Daund Gambling Raid:
esakal
प्रफुल्ल भंडारी
दौंड : दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकार्यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीला पुणे ग्रामीण पोलिस दलातील दौंड पोलिसांनी २९ दिवसांनी गांभीर्याने घेतले आहे. पोलिसांनी जुगार अड्डा चालविणारा पक्षाचा नगरसेवक मंगेश चलवादी याच्या अड्ड्यावर धाड टाकून त्याच्यासह एकूण नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.