दौंडमधील अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्याची मागणी

दौंडमधील अवजड वाहतूक 
शहराबाहेर वळविण्याची मागणी
Published on: 

दौंड, ता. २६ : दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गावरील नगर मोरी चौक ते भीमनगर या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून ती शहराबाहेरील मार्गाने वळवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाच्या उद्योग विभागाचे शहराध्यक्ष गौरव सरनोत व परिसरातील व्यापाऱ्यांनी दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना भेटून एका निवेदनाद्वारे ही मागणी केली. दौंड ते श्री क्षेत्र सिद्धटेक या अष्टविनायक मार्गावरील नगर मोरी चौक ते भीमनगर या मार्गावर मुख्य बाजारपेठ, खासगी शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, राष्ट्रीयीकृत बॅंक, खासगी वित्तीय संस्थांचे कार्यालय, तलाठी कार्यालय आणि अनेक दुकाने आहेत. बाजारपेठ व शाळांमुळे दिवसभर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, ग्राहक आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. शहरातील अनेक अंतर्गत रस्तेही या मुख्य मार्गाला जोडलेले असल्याने वाहतुकीचा ताण वाढत आहे. या मार्गावरून क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारी वाहने, कंटेनर, अवजड मालवाहू ट्रक आणि मोठ्या बस वेगाने जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होत असून, वादावादीचे प्रसंगही निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडी आणि वादाच्या घटनांचा स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून, व्यापारावरही परिणाम होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, डंपर, मालवाहू ट्रक आणि इतर अवजड वाहने दौंड शहराबाहेरील पर्यायी मार्गाने वळवावीत, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com