
Khaldkar Couple Dies Saving Goat from Electrocution on Diwali Padwa
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव : नानगाव (ता. दौंड )येथील खळदकर दांपत्याचा दीपावली पाडव्याच्या दिवशी विद्युत पंपाला जोडणाऱ्या खराब केबलमधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. या धक्क्याने मनीषा खळदकर (वय ४६ वर्षे) राजाराम खळदकर ( वय ५३ वर्षे) दोघेही राहणार ( नानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे) यांचा मृत्यू झाला.