esakal | दौंड : उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्याची दहशत!
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड : उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्याचे आढळून आलेले ठसे.

दौंड : उंडवडी-सौंदडवाडी परिसरात बिबट्याची दहशत!

sakal_logo
By
संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा

राहू : परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून आल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच दिपमाला जाधव, माजी सरपंच सचिन गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे, राजेंद्र नवले, आकाश होले, अमोल होले यांनी वनविभागाकडे केली आहे. (Daund Leopard terror in Undwadi Saundadwadi area)

बिबट्यांनी दोन दिवसापूर्वी येथील हरपळे-ढोरे फार्मवर दोन कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले होते. तसेच शुक्रवारी (दि.७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौंदडवाडी येथे विष्णू गवळी आणि अमित गवळी हे शेतात काम करत असताना अचानक त्यांना बिबट्या दिसला. याची खबर त्यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा: जुन्नर : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा तालुक्यातील सरपंचांकडून निषेध

बिबट्या दीड ते दोन वर्षाचा असावा असा प्राथमिक अंदाज वनअधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीने याबाबतच्या कागदपत्रांची त्वरीत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पूर्तता करावी. दोन दिवसांत परिसरात तातडीने पिंजरा लावला जाईल, असे आश्वासन वनाधिकारी चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री अपरात्री शेतात न जाण्याचा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला. घराभोवताली विजेचे दिवे चालू ठेवा. अधून-मधून फटाके वाजवा असे आवाहन वन विभागाच्यावतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे.