दौंड : बुलेट चोर 'सैराट'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sairat_Jadhav
Sairat_Jadhav

दौंड : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महामार्गांवर वाटमारी आणि लूटमार करणारा सराईत गुन्हेगार सैराट जाधव आणि त्याच्या एका साथीदारास पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. दौंड तालुक्यात महामार्गावर झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करीत असताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

रावणगाव (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर २७ मार्च रोजी मध्यरात्री पंढरपूर येथून दुचाकीवर पुण्याकडे निघालेल्या हेमंत करे यांच्या दुचाकीला दुसरी दुचाकी आडवी मारून दोघांनी त्यांची दुचाकी, मोबाइल, रोख असा एकूण ६७ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी प्राप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लातूरमधून ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३०, रा. रुपचंदनगर तांडा, रेणापूर, जि.लातूर) आणि अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव (वय १९, रा. औसा हनुमान, लातूर) या दोघांना ३१ मार्च रोजी ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान संशयित आरोपी अजय जाधव याच्याकडे रावणगाव येथून हेमंत करे यांची चोरलेली स्प्लेंडर मोटरसायकल आणि सैराट जाधव याच्याकडे थेऊरफाटा (ता. हवेली, जि.पुणे) येथून चोरलेली एक लाल रंगाची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल आढळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. 

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, सहायक उप निरीक्षक शब्बीर पठाण, अंमलदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, काशिनाथ राजपुरे यांनी या कारवाईत भाग घेतला. दौंडचे परिविक्षाधीन उप अधीक्षक मयूर भुजबळ या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

सैराटवर चाळीस पेक्षा अधिक गुन्हे
संशयित आरोपी सैराट जाधव याच्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जबरी चोरी, दुचाकी आणि चारचाकी वाहन चोरी, दोनवेळा कोठडीतून पळून जाणे, कोठडीत असताना कारवाई टाळण्याकरिता स्वतःच्या अंगावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे, पोलिस किंवा लष्करी जवानाचा पेहराव करून लूटमार करणे आदी एकूण ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com