दौंड- पुणे मेमू गुरूवारपासून धावणार

daund pune MEMU local train will start from thursday
daund pune MEMU local train will start from thursday

पुणे : ः दौंड- पुणे मार्गावर येत्या गुरूवार (ता. ८) पासून मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (मेमू) रेल्वेगाडी धावणार आहे. या गाडीतून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.ही गाडी पुण्यावरून दौंडला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. तर दौंडला सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी दौंडला रात्री ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. दौंडवरून ही गाडी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी पुण्यात पोचेल. पुणे-दौंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर ही गाडी थांबेल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठीच सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेकडे तसा पाठपुरावा करण्यात येईल. त्यालाही अपेक्षित यश येईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. या गाडीसाठी सुळे यांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे पुण्यातील विभागीय कार्यालय, प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा - कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा

पुणे-दौंड-पुणे प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर मेमुला मंजुरी मिळाली. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे सध्या आठ कोचने मेमु धावणार आहे. आत्ता कोविडमुळे सर्वच प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. दौंड-पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या लक्षात घेता भविष्यात आणखी सात कोच वाढवावे लागतील. तसेच या मेमुच्या फेऱ्या वाढवाव्या लागतील, याची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com