Railway Station Fire: दौंड रेल्वे स्थानकातील बंद कॅन्टीनला आग; फलाटापर्यंत अग्निशमन बंब पोहोचण्याचा मार्गच नाही

Daund Railway Station Fire: दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरील बंद कॅन्टीनला आग लागली; अग्निशमन बंबाला फलाटापर्यंत पोहोचता न आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाइपने पाणी मारून आग आटोक्यात आणली.
Fire breaks out at a closed canteen on platform three at Daund railway station, prompting railway staff to use a water pipe to extinguish the flames.

Fire breaks out at a closed canteen on platform three at Daund railway station, prompting railway staff to use a water pipe to extinguish the flames.

esakal

Updated on: 

दौंड : दौंड रेल्वे जंक्शनच्या फलाट क्रमांक तीनवरील बंद कॅन्टीनला २७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. दौंड नगरपालिकेचे अग्निशमन पथक बंबासह तातडीने दाखल झाले; मात्र, फलाटापर्यंत जाण्यासाठी आपत्कालीन वाहनमार्ग नसल्याने बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवासी गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाइपमधून पाण्याचा मारा करून सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

Loading content, please wait...