दौंड तालुक्यात ''कोसळधारा''

दौंड तालुक्यात ''कोसळधारा''
Published on: 

दौंड, ता. २ : दौंड तालुक्यात रविवारी (ता. १) सायंकाळनंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सरासरी १०.७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, ज्यामुळे शासनाने तालुक्याला पहिल्या यादीतच दुष्काळी जाहीर केले आहे. नोव्हेंबर महिन्यात सरासरी २४.७ मि. मी. पाऊस होतो, मात्र यंदा पहिल्याच दिवशी सरासरीच्या ४३ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारवा मिळाला असून रब्बी पेरण्यांना, विशेषतः मका आणि कडवळ या चारा पिकांना फायदा होणार आहे. तसेच कांदा रोपवाटिकांनाही यामुळे दिलासा मिळेल, अशी माहिती दौंड पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश अडसूळ यांनी दिली.

● मंडल निहाय झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे :-
देऊळगाव राजे - ५.३, पाटस - ३.५ , यवत - ७ , केडगाव - ५.८, राहू - १८.५ , वरवंड -७, रावणगाव - १२.५ दौंड - ४ , बोरीभडक - ३३.५ , खामगाव - ०.५ , वडगाव बांडे - २६.८, पारगाव - १९.३, बोरीपार्धी - ९ , गिरीम - ४ , कुरकुंभ - ६, मलठण - ८.५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.