एसटीच्या स्मार्ट कार्डचे दौंड स्थानकात वितरण
दौंड, ता. २१ : दौंड एसटी बसस्थानकावर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनांतर्गत सवलतधारकांना स्मार्ट कार्ड वितरणास सुरवात करण्यात आली आहे. शासनाच्या सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदींना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
दौंड शहरातील श्री काळूबाई मंदिराजवळील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात स्मार्ट कार्ड वितरण दौंड एसटी आगार प्रमुख शिवाजी कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बस स्थानक प्रमुख प्रतीक अनाके, वाहतूक नियंत्रक गणेश शेलार यांच्यासह दत्तात्रेय तिगोटे, मुनीर शेख, अविनाश पाळेकर व प्रवासी बांधव या वेळी उपस्थित होते. सवलतधारक प्रवाशांना तिकिटाऐवजजी सशुल्क स्मार्ट कार्ड दिले जात आहे. आधार कार्ड दाखवून विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना यापुढे स्मार्ट कार्ड असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोखाविरहित व्यवहार करण्यासह सुलभ व सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या योजनेचा सर्व सवलतधारी प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक शिवाजी कानडे यांनी केले आहे.
‘ज्येष्ठ, महिलांना वगळा’
वार्धक्य व अन्य कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे यंत्राशी जुळत नसल्याने डिजिटल पेमेंट करताना त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ महिलांना देखील स्मार्टकार्ड काढणे आणि त्यानंतर रिचार्ज करणे सुसह्य नाही. आधार कार्ड दाखवून मिळणारी सवलत बंद करण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक व महिलांना स्मार्ट कार्ड मधून वगळण्याची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

