Kala kendra firing: कला केंद्रात गोळीबार झाला!, पुणे ग्रामीण पोलिसांनी केली पुष्टी

Chouphula Kala kendra shooting : तीन कला केंद्रांपैकी कोणत्या कला केंद्रात गोळीबार झाला याबद्दल पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
Police cordon off the Chouphula Art Center in Daund Taluka after a confirmed firing incident, as investigation begins.
Police cordon off the Chouphula Art Center in Daund Taluka after a confirmed firing incident, as investigation begins. esakal
Updated on

Pune Rural Police news: पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुणे ग्रामीण पोलिसांकडून पुष्टी करण्यात आली आहे. हवेत गोळीबार झाल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. तर गोळीबार नेमका कुणाकडून केला गेला याबद्दल अद्याप तपास सुरू आहे.

दौंड तालुक्यातील चौफुल्याच्या तीन कला केंद्रांपैकी कोणत्या कला केंद्रात गोळीबार झाला याबद्दल पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तपासासाठी चौफुल्याच्या अंबिका कला केंद्रात अप्पर पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत. पण यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीने गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. या घटेनंतर यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

चौफुला कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र गोळीबाराचे कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं होतं. शिवाय थिएटर मालकाकडूनही असं काही घडलंच नाही असं सांगण्यात आल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं.

Police cordon off the Chouphula Art Center in Daund Taluka after a confirmed firing incident, as investigation begins.
Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

याशिवाय गोळीबाराच्या घटनेत डान्स करणारी तरुणी जखमी झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी सीसीटीव्हींची तपासणी सुरू केली आहे. या घटनेत सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे.

Police cordon off the Chouphula Art Center in Daund Taluka after a confirmed firing incident, as investigation begins.
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

सत्ताधारी आमदारचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनीच हा राडा केल्याचा संशय आहे. आमदाराच्या भावाच्या मित्राने गोळीबार केल्याचं म्हटलं जातं होतं. त्यानंतर आता पोलिसांकडूनही गोळीबार झाल्याची पुष्टी केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com