

Pune
esakal
दावडी: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दावडी (ता. खेड) परिसरात मोठे नुकसान झाले आहे. ओढ्यालगत असलेल्या प्लॉटिंगच्या संरक्षणभिंतीचा काही भाग कोसळल्याने ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बदलला आणि मोठ्या प्रमाणात पाणी थेट शेतांमध्ये शिरले. यामुळे मारुती बोत्रे व शंकर बोत्रे यांच्या शेतीसह घरामध्येही पाणी घुसून पिकांचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.