Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

दीर्घायुष्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच दुसऱ्याच दिवशी झाला अपघात.
Vir Shinde

Vir Shinde

sakal

Updated on

मंचर - मंचर-नारायणगाव जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर एसटी बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अकरावीतील विद्यार्थी वीर अनिल शिंदे (वय-१७, रा. अवसरी खुर्द) याचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले साहिल संदीप टेमकर व तेजस मंगेश भालेराव (दोघेही वय १७, रा. अवसरी खुर्द) हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com