
कुर्डू - शेतातील मका विकून आलेले रोख पैसे व घरातील सोने, अंदाजे १२ लाख रुपयाच्यावर रक्कम अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून भर दिवसा डल्ला मारल्याची घटना अंबाड, ता. माढा येथे शुक्रवारी १० जानेवारी रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान युवराज हनुमंत कदम (कदम वस्ती) यांच्या येथे घडली.