esakal | शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

दौंड तालुक्यातील केडगाव येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी मुगाचे लिलाव दिवसाआड सुरू करण्यात आल्याची माहिती दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव 

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी मुगाचे लिलाव दिवसाआड सुरू करण्यात आल्याची माहिती दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दौंड तालुक्यासह शेजारील शिरूर व अन्य तालुके आणि नगर जिल्ह्यातील मूग उत्पादक विक्रीसाठी येतात. यंदा चांगले पर्जन्यमान आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर कडधान्यांच्या मागणीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुगाची मोठी आवक अपेक्षित आहे. मुगाची संभाव्य आवक विचारात घेऊन बाजार समितीच्या वतीने केडगाव उपबाजारात व्यापाऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली. बैठकीत मूग उत्पादकांच्या हितासाठी दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांसह समितीचे उपसभापती संपत निंबाळकर, ज्येष्ठ संचालक माणिक राऊत, रामदास चौधरी, राजू जगताप, बाजार समिती सचिव तात्यासाहेब टुले, आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या निर्णयानुसार केडगाव येथे मंगळवार, गुरूवार, शनिवार, सोमवार व पुन्हा मंगळवार (आठवडे बाजार दिवस), असे लिलाव होणार आहेत. चालू आठवड्यात १० ऑगस्ट रोजी केडगाव उपबाजारात मुगाची ३३२ आवक होऊन त्यास प्रति क्विंटल किमान ४२०० व कमाल ७००० रूपये इतका भाव मिळाला आहे. बाजार समितीच्या वतीने मुगासाठी आधारभूत शेतमाल केंद्राकरिता (संचयन) प्रस्ताव पाठविल्याची माहिती तात्यासाहेब टुले यांनी दिली.

loading image