

Pune Traffic Heavy Vehicles Banned in Peth Areas
sakal
पुणे - शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडईसह प्रमुख पेठांमधील दुकानांना दिवसा माल पुरवठा करणाऱ्या वाहनांना तात्पुरती बंदी घातली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांना केवळ रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच हलक्या मालवाहू वाहनांतून मालाची चढ-उतार करता येणार असून, हे निर्बंध १२ नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील.