

लोगो : डीसीसी बॅंक निवडणूक
‘सोसायटी’तून ३ आमदार, ४ माजी आमदार उमेदवार
भाजप समविचारीचे उमेदवार; माढ्यातून रणजित शिंदे, मंगळवेढ्यातून आवताडे; ‘माळशिरस’चा तिढा कायम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत उद्या (शुक्रवारी) संपणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २९) रात्री माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर (ता. मोहोळ) येथील निवासस्थानी भाजप समविचारी आमदार, माजी आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात ‘सोसायटी’ मतदारसंघातील ११ पैकी माळशिरस तालुका वगळता उर्वरित १० तालुक्यांमधील उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली. यात तीन आमदार, चार माजी आमदार व तीन पदाधिकारी असून, यांपैकी एक माजी आमदारपुत्र, तर एक आमदाराच्या कुटुंबातील आहे.
सोलापूर जिल्हा बॅंकेसाठी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांची भूमिका ‘एकला चलो रे’ची आहे. दुसरीकडे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांची भूमिका स्वतंत्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांसह समविचारी आमदार-माजी आमदारांच्या बैठका झाल्या. शुक्रवारी (ता. ३०) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनगर येथे बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, जयवंतराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सुरेश हसापुरे व रणजित शिंदे यांनाही बैठकीचे निमंत्रण होते. हे सगळेच बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे राजन पाटील म्हणाले. याशिवाय अन्य आठ मतदारसंघांतून कोण उमेदवार असणार, यासंदर्भात उहापोह यावेळी झाला. तूर्तास, इच्छुकांचे अर्ज भरून घ्यायचे आणि छाननीपूर्वी उमेदवार निश्चित करायचे, असेही ठरल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट...
भाजप समविचारीचे ‘हे’ संभाव्य उमेदवार
आमदार सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), बाबासाहेब देशमुख (सांगोला), माजी आमदार राजेंद्र राऊत (बार्शी), प्रशांत परिचारक (पंढरपूर), जयवंतराव जगताप (करमाळा), राजन पाटील (मोहोळ), दिलीप माने (उत्तर सोलापूर) आणि बबनराव आवताडे (मंगळवेढा), रणजित शिंदे (माढा), तर सुरेश हसापुरे (दक्षिण सोलापूर) हे बॅंकेच्या विकास सोसायटीचे संभाव्य उमेदवार असतील. माळशिरस तालुक्यातून ‘समविचारीं’चा उमेदवार कोण, हे अजून ठरलेले नाही.
कोट : PNE26W62679
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत आजवर कोणीच पक्षीय राजकारण केलेले नाही. बॅंकेचे हित जपणाऱ्या समविचारींनी निवडणुकीसाठी एकत्र यावे आणि चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आमचे आवाहन आहे.
- राजन पाटील, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.