

डीसीसी बॅंक
-----------
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही
उद्या सुनावणीची शक्यता; वकिलांनी दिली माहिती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या सहा माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी याचिका फेटाळल्यावर माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच आज (मंगळवारी) सुनावणी होऊन निर्णय होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी (ता. १७) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. आता १९ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.
जिल्हा बॅंकेचे माजी संचालक रणजितसिंह मोहिते पाटील, संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे यांनी ॲड. अभिजीत कुलकर्णी, महेश शिंदे, अभय अंतुरकर यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी याचिकाकर्त्यांच्या वतीने भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह, दिल्ली उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल बाजू मांडणार आहेत. दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अपात्र ठरविल्याचे प्रकरण लवकर सुनावणीला घ्यावे, या विनंतीला सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १९) सुनावणीची शक्यता असून तत्पूर्वी, संबंधित सरकारी यंत्रणा व सहकार निवडणूक प्राधिकरणास नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ‘सकाळ’ला सांगितले. आता सर्वोच्च न्यायालयात या सहा माजी संचालकांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.