
आप्पासाहेब खेडकर
देऊळगाव राजे : आलेगाव पुर्नवसन (ता.दौंङ ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इयत्ता पहिलीतील नवगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विघार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाठयपुस्तकांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी विघार्थ्यांशी संवादही साधला.