Bhimashankar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन; राज्यातील बळीराजा सुखी होवो, अशी भीमाशंकर चरणी केली प्रार्थना

श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे घेतले दर्शन.
DCM Eknath Shinde Seeks Blessings at Bhimashankar

DCM Eknath Shinde Seeks Blessings at Bhimashankar

sakal

Updated on

भीमाशंकर - पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ३१ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा व दुग्धाभिषेक केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com