Katraj Crime : गुजर-निंबाळकरवाडी तलावात आढळला मतिमंद महिलेचा मृतदेह, भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरु

निर्मला एकनाथ साठे (वय ६०) रा. भारतनगर, गुजर-निंबाळकरवाडी असे महिलेचे नाव आहे.
Gujar-Nimbalkarwadi lake
Gujar-Nimbalkarwadi lakeesakal
Updated on
Summary

सदरची महिला मतिमंद असून घरातून केव्हाही निघून जात होती, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti University Police) दिली.

कात्रज : गुजर-निंबाळकरवाडीच्या नवलाईदरा तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती कात्रज अग्निशामक दलाला रविवारी (ता. १४) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला.

निर्मला एकनाथ साठे (वय ६०) रा. भारतनगर, गुजर-निंबाळकरवाडी असे महिलेचे नाव आहे. सदरची महिला मतिमंद असून घरातून केव्हाही निघून जात होती, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti University Police) दिली.

Gujar-Nimbalkarwadi lake
शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मनोरमा खेडकरांना नोटीस; दहा दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास होणार कारवाई

तसेच, मृतदेह पुढील तपासणीसाठी ससूनला पाठवण्यात आला आहे. कात्रज अग्निशमन दलाचे प्रमुख प्रदीप खेडेकर, चालक गणेश भंडारे, फायरमन पंकज इंगवले, निलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांच्यासह भारती विद्यापीठ पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com