Pune News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्धीला पुन्हा मुदतवाढ

पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून, त्या आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
Pune Municipal Corporation election

Pune Municipal Corporation election

Sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. १४) प्रारूप मतदार यादी जाहीर होणार होती. त्यासाठी प्रशासनाने प्रभागनिहाय याद्या तयार केल्या आहेत. पण गुरूवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाकडून अचानकपणे प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com