पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी येत्या सोमवारपर्यंत (ता. २१) मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे.