'आयटीआय'चा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ; आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

राज्यात शासकीय 'आयटीआय'ची संख्या ४१७ तर खासगी संस्थांची संख्या ५६९ आहे. या दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये मिळून १ लाख ४५ हजार ६३२ प्रवेश क्षमता आहे.

पुणे : इयत्ता १०वी नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून, १० दिवसात १ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अर्ज करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासगी आणि शासकीय 'आयटीआय' प्रवेशासाठी १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सर्व प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईनद्वारे होत आहे. व्यवसाय शिक्षण विभागाने आयटीआय प्रवेशाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारी जाहीर केली आहे. अर्ज करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने अर्जाची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली.

होस्टेलमधील साहित्य घरी न्यायचंय? मग एक मेल पाठवा अन् साहित्य घेऊन जा!​

राज्यात शासकीय 'आयटीआय'ची संख्या ४१७ तर खासगी संस्थांची संख्या ५६९ आहे. या दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये मिळून १ लाख ४५ हजार ६३२ प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत १ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख २७ हजार ९६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यातील १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरून अर्ज निश्‍चिती केली आहे. तसेच ९६ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही भरला आहे.

गतवर्षी आयटीआय प्रवेशासाठी सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी प्रवेश घेतला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for ITI application has been extended till August 21