Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी ५०० वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र.....
traffic warden

traffic warden

sakal

Updated on: 

पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी ५०० वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, ठेकेदाराच्या क्षमतेवरून आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे या निविदेला आयुक्त नवलकिशोर राम यांनी ऑक्टोबरमध्ये स्थगिती दिली होती. मात्र, आता प्रशासनाने केलेल्या चौकशीनंतर ठेकेदाराला क्लीन चिट दिल्याने पोलिसांच्या मागणीनुसार शहरात वॉर्डन पुरविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...