प्रसिद्ध लेखिका,आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन

Death of famous writer Meena Deshpande, daughter of Acharya Atre
Death of famous writer Meena Deshpande, daughter of Acharya Atre
Updated on

पुणे : आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि सिद्धहस्त लेखिका मीना सुधाकर देशपांडे (वय 86) यांचे अमेरिकेमध्ये कोरोनामुळे निधन झाले. यांच्या‌ निधनामुळे अत्रे परिवारातील एक दुवा निखळल्याची‌ भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात‌‌ येत आहे.

''मीना देशपांडे यांच्या 'हुतात्मा' या कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. पाश्चिमात्य लेखक आणि प्रसिद्ध स्त्रिया यांच्यावरील त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. पश्चिमगंधा, मायकल जॅक्सनवरचे, मर्लिन मेन्रो वरील त्यांचे पुस्तक वाचण्यासारखे आहे. आचार्यांचे  प्रसिद्ध आत्मचरित्राचे, आचार्यनंतरचे खंड(6, 7, 8) त्यांनी लिहिल्याचे मला आठवते आहेत. त्यांच्या जाण्याने आचार्यांचा प्रत्यक्ष शेवटचा दुवा निखळला आहे. माझ्या आवडत्या लेखिका गेल्या. मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे,''अशी भावना फेसबुकवरील त्यांचे स्नेही मिलींद मधुकर चिंधडे यांनी व्यक्त केली आहे. राजेंद्र पै यांनी म्हटले आहे, की आत्रेय साखळीतील आमचा अखेरचा आधार निखळला. कोव्हिडशी झुंज देता देता अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

मीना देशपांडे यांची साहित्यसंपदा

आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह), अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र, पपा : एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह), मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै), ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com