बाप रे, कीटकनाशक फवारणी करताना पुण्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अशी घ्या काळजी!

Death of a farmer in Pune while spraying pesticides
Death of a farmer in Pune while spraying pesticides

नारायणगाव (पुणे) : शेतातील तण वेळीच न काढल्यास मुळ पिकाच्या वाढीस व उत्पादनात मोठी घट होते. मजूर टंचाई , वाढलेली मजुरी या मुळे शेतकऱ्यांचा कल तणनाशक फवारणीकडे वाढत आहे. तणनाशक फवारणीमूळे खुरपणीचा खर्च व वेळेची बचत होते. शारीरिक कष्ट कमी होतात. मात्र, तणनाशक फवरताना काळजी न घेतल्यास फवारणी करणाऱ्याच्या आरोग्यावर व शेजारच्या इतर पिकांवर तणनाशकाचा दुष्परिणाम होऊन मोठे नुकसान होते.

वाऱ्यामुळे तणनाशकाचे तुषार उडून द्राक्ष,टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, काकडी, चवळी, वालवड, मिरची, द्राक्ष, डाळिंब आदी पिके करपल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. या मुळे तणनाशक  फवारताना दक्षता घेणे आवश्यक आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे पीक शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी दिली.

आरोग्यासाठी घातक : कीटकनाशका प्रमाणेच तणनाशके मानवाच्या आरोग्याला घातक आहेत.तणनाशकामुळे कर्करोग, त्वचा विकार होण्याचा धोका संभवतो.फवारणी करताना काळजी न घेतल्यास विषबाधा होऊन उलटी होणे, चक्कर येणे, जुलाब होणे, डोळ्याची आग होणे,आदी लक्षणे दिसतात.

औषधें विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी :
2-4-D  सारख्या  तणनाशकांची विक्री करताना कृषी खत औषधे विक्रेत्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खात्री केल्याशिवाय  2-4-D ची विक्री न करण्याचे बंधन औषधे विक्रेत्यावर आहे.उसाच्या बाजूला दुसरे पीक असेल तर  तणनाशकाची विक्री करू नये.अॅट्राझीन, ऑलाक्लोर, पेंडोमिथिलीन, मेथॉबॅथीझुरॉन, मेट्रीब्यूझिन, ऑक्सिफ्लोरफेन, क्युझालोफोप, प्रोपक़ुझ्यफ़ोप आदी  तणनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी या बाबतची माहिती विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे.

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता:
१)विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत.
२) मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
३) तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंपच वापरावा.
४) तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
५)जोराचे वारे नसताना तणनाशकाची फवारणी करावी. फवारणीनंतर दोन ते तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे.
६) तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडू नये. या साठी फवारणी करणाऱ्याने मागे मागे सरकत जाऊन फवारणी करावी.
७) ग्लायफोसेटसारखे तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी २१ दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
८) तणनाशकांची फवारणी सर्वत्र समान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
९) उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी हूडचा वापर करावा.
१०) फवारणी नंतर पंप  साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावा. शक्यतो तणनाशकाची फवारणी करण्यासाठी स्वतंत्र पंप वापरावा. 
११) तणनाशके पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा, हाताचा वापर कस्त नये.
१२) तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गढूळ किंवा गाळ मिश्रित पाणी वापरु नये.
१३) फवारणी करीत असताना सेवन, धूम्रपान किंवा डोळे चोळणे टाळावे.
१४) तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत,कंपोस्ट खत,गांडुळ खतांचा वापर करावा.

 फवारणीसाठी वापरावयाचे नोझल्स:
तणनाशकाच्या प्रकारानुसार फ्लॅटफेन अथवा फ्लडजेट प्रकारातील नोझलचा वापर तणनाशक फवारणी करताना करावा. जमिनीवर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशक फवारणी करताना होलोकोन व सॉलिडकोन प्रकारातील नोझलचा वापर टाळावा. या प्रकारातील नोझलने तणनाशकाची एकसारखी फवारणी होत नाही, परिणामी अपेक्षित तण नियंत्रण मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com