दौंडमधील कोरोनाबाधिताचा मृत्यू, 90 वर्षाच्या महिलेलाही बाधा

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 26 मे 2020

दौंड शहरातील गोवा गल्ली येथील ७० वर्षीय नागरिकास २० मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती.

दौंड (पुणे) : दौंड शहरातील ७० वर्षीय कोरोनाबाधित नागरिकाचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर, आज एका ९० वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २१ झाली असून, त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

लय भारी, शिवरायांच्या जीवनावर पठ्ठ्याने रेखाटली चित्रे

दौंड शहरातील गोवा गल्ली येथील ७० वर्षीय नागरिकास २० मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. शहरातील कोविड केअर सेंटर येथे या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या १४ नागरिकांचे घशातील द्रव चाचणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविले असता सर्व १४ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला होता.

पुणेकरांनो, पुढचे दोन दिवस घरातच रहा...

या 70 वर्षीय नागरिकाचा आज पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या नागरिकाच्या पुणे येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कारास उपस्थित कुटुंबीतील तीन सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या तीन जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आज (ता. २६) दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा               

दरम्यान, आज शहरातील दौंड- सिध्दटेक रस्त्यालगतच्या नेहरू चौक येथील एका नव्वद वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी प्राणवायू संबंधी त्रास जाणवू लागल्याने उप जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे शहरातील कोविड केअर सेंटर येथे स्वॅब टेस्ट साठी नमुने घेण्यात आले आहेत.

दौंड शहरात १६ ते २६ मे या कालावधीत दौंड- सिध्दटेक रस्त्यालगतच्या निवासी भागात एकूण पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

दौंड तालुक्यातील आजअखेर बाधितांची संख्या २१ झाली असून, त्यामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे २ पोलिस व ४ नागरिकांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a man infected with a corona in Daund