The death of an old man in the crash of a crane
The death of an old man in the crash of a crane

आजोबा रस्ता ओलांडत होते अन् भरधाव क्रेनने...

Published on

पिंपरी : रस्ता ओलांडत असताना क्रेनची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.22) सायंकाळी चारच्या सुमारास पिंपरीतील गांधीनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

बबन केरू साळवे (वय 65, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. साळवे हे सायंकाळी चारच्या सुमारास गांधीनगर येथील पीएमपी बसथांब्यासमोरील रस्ता पायी ओलांडत होते. त्यावेळी या रस्त्याने जात असलेल्या क्रेनने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com