धक्कादायक : मयत व्यक्तीच्या खात्यातील साडेचार लाख लंपास; गुन्हा दाखल

या खात्यामध्ये ४ लाख ५२ हजार ८६ रुपये शिल्लक होते.

Fraud
Fraudsakal

वालचंदनगर : लाकडी (ता.इंदापूर) येथील मयत झालेल्या व्यक्तिच्या बॅंक खात्यातील साडेचार लाख रुपये अज्ञात व्यक्तीने एटीएम द्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिीवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी लक्ष्मी बाळकृष्ण वनवे (वय ५४,रा. लाकडी) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लाकडी येथील बाळकृष्ण हनुमंत वणवे यांचे २२ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले आहे. त्यांचे सणसरमधील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेमध्ये बचत खाते होते. या खात्यामध्ये ४ लाख ५२ हजार ८६ रुपये शिल्लक होते.

७ जानेवारी ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान अज्ञात व्यक्तिीने एटीएमचा वापर करुन खात्यातील ४ लाख ५० हजार ३७२ रुपये काढून अपहार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

यासंदर्भात लक्ष्मीबाई वणवे यांनी सांगितले की, बाळकृष्ण वणवे हे अशिक्षीत होते.खूप दिवसापूर्वी बॅंकेत खाते उघडले होते. जमीन विकलेले पैसे बॅंकेमध्ये ठेवले होते.व ते कुणीतरी एटीएम मधून काढल्याचे बॅंकेचे अधिकारी सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com