Pune : रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यू

पाऊस पडत असल्याने डोंगर वाटा व कडे निसरडे झाले होते. यामध्ये एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो २५ ते ३० फूट खाली पडला.
Pune
PuneSakal

शिनोली - जंगलात रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या कानसे ता. आंबेगाव येथील अजय शशिकांत कराळे (वय २३) या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अजय कराळे,अक्षय कराळे व संतोष चपटे असे तिघे मिळून डोंगरामध्ये चाव्याचे कोंब व कोळूची भाजी काढण्यासाठी गेले होते.

Pune
Mumbai News : मार्वे बीच लगत समुद्रात 5 मुले बुडाली.. दोघांना वाचवण्यात यश तिघांचा शोध सुरू

पाऊस पडत असल्याने डोंगर वाटा व कडे निसरडे झाले होते. यामध्ये एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो २५ ते ३० फूट खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला व हात फॅक्चर झाला.

Pune
Mumbai : अधिवेशन चहापान पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेता कोण ?

सोबत असल्या दोघा मित्रांनी त्याला तात्काळ डोंगरावरून खाली आणून घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांनी आपला जीव सोडला होता. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असल्याचे आंबेगाव तालुका बाजार समिती संचालक संदीप चपटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com