esakal | तक्रार देणाऱ्या ज्येष्ठाचा पोलिस चौकीतच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file pic

गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याबरोबर स्टॉल लावण्यावरून झालेल्या भांडणाबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा पोलिस चौकीमध्येच हृदयविकाराने मृत्यू झाला.

तक्रार देणाऱ्या ज्येष्ठाचा पोलिस चौकीतच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याबरोबर स्टॉल लावण्यावरून झालेल्या भांडणाबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा पोलिस चौकीमध्येच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता शनिवार पेठ पोलिस चौकीत घडली. 

प्रकाश खळीकर (वय ६०, रा. गुप्ते बिल्डिंग, बुधवार पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खळीकर यांचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासमोरच  नाश्‍त्याचा स्टॉल आहे. मंडळाचे पदाधिकारी व खळीकर यांच्यामध्ये स्टॉलवरून वाद सुरू होते. यावरून पदाधिकाऱ्याने खळीकर यांना शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यासंदर्भात खळीकर हे पत्नीसमवेत बुधवारी दुपारी तक्रार देण्यासाठी चौकीमध्ये गेले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली, त्याचवेळी ते चक्कर येऊन पडले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टॉल्स, गॅस सिलिंडर ठेवण्यास मनाई केली आहे, मात्र ते ऐकत नव्हते. त्यामुळे पोलिसांना सांगितले. त्यानुसार यांना पोलिस घेऊन गेले. त्याव्यतिरिक्त आमचा त्यांच्याशी संबंध नव्हता, असे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांनी सांगितले.

loading image
go to top