

फोटो ः सागर बिरदवडे
सिद्धेश वीर
---------------
डेक्कन जिमखाना क्लब ः मैदानावर सुरू झालेल्या डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहारा पुणेरी बाप्पा संघाविरुद्धच्या लढतीत पूना क्लबचा अकीब शेख सुरेख फटका मारताना.
---------------
पूना क्लब आणी पीवायसी क्लबचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय
डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट
पुणे, ता. १५ ः डेक्कन जिमखाना क्लबच्या आयोजित ‘डेक्कन जिमखाना करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब आणी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सागर बिरदवडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लबने सहारा पुणेरी बाप्पा संघाचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सहारा पुणेरी बाप्पा संघाचा डाव ७६ धावांत आटोपला यावेळी यशराज खाडे वगळता एकाही फलंदाजाचा टिकाव लागू शकला नाही. सागर बिरदवडेने चार तर कुणाल थोरात आणि प्रणयसिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूना क्लबने ९.१ षटकात दोन बाद ७८ धावा करून विजय मिळविला. यावेळी नौशाद शेख, अजिंक्य नाईक आणि अकीब शेखने केलेली खेळी उपयुक्त ठरली.
दुसऱ्या लढतीत सिद्धेश वीर आणी धीरज फटांगरेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना क्लबने पारसी जिमखाना संघावर ४७ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी क्लबने पाच बाद २१७ धावा केल्या यावेळी सिद्धेश वीरने ४८ चेंडूत बारा चौकार आणि तीन षटकारांसह ८९ धावांची, धीरज फटांगरेने ४४ चेंडूत सात चौकार व एक षटकारासह ५६ धावांची खेळी केली. सिद्धेश वीर आणी धीरज फटांगरे या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटकरिता ८६ चेंडूत केलेली १५५ धावांची भागीदारी उपयुक्त ठरली. त्यानंतर अद्वय शिधयेनेही नाबाद ४० धावांची खेळी केली समर्थ वाबळेने दोन गडी बाद केले. प्रत्यूत्तर देताना पारसी जिमखाना संघाला ६ बाद १७० धावापर्यंत मजल मारता आली यावेळी आकाश बोरा (४१) आणि यशवंत काळेने (३२) केलेली खेळी अपुरी ठरली. पियुष साळवीने तीन गडी बाद केले.
या स्पर्धेतील ‘‘सामन्याचा मानकरी’ हा मान सागर बिरदवडे (पूना क्लब) आणी सिद्धेश वीरने (पीवायसी क्लब) मिळविला.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धा संचालक आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव मृगांक राठी, माजी रणजीपटू निखिल दिक्षीत, पराग चितळे, समितीचे सदस्य मंगेश भुस्कुटे आणि सुबोध परांजपे हे उपस्थित होते.
--------------
डेक्कन जिमखाना टी-२० क्रिकेट जोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.