esakal | डेक्कन आयटीएफमध्ये मिळाले सर्वात मोठे ‘टायटल’
sakal

बोलून बातमी शोधा

pune

डेक्कन आयटीएफमध्ये मिळाले सर्वात मोठे ‘टायटल’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘दोन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या डेक्कन आयटीएफ महिला टेनिस टूर्नामेंट जिंकल्यावर मला २५ हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात मिळाले होते. मी केलेल्या टेनिसच्या कारकिर्दीतला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टायटल असल्याचे मी मानते,’’ अशी भावना टेनिस खेळाडू एम्मा राडूकानूने व्यक्त केले.

ग्रेट ब्रिटनच्या १८ वर्षीय टेनिस खेळाडू एम्मा राडूकानूने एक नवा इतिहास रचला आहे. राडूकानूने ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धांच्या इतिहासात १७ व्या क्रमांकावरील मारिया सक्कारीचा पराभव करत ती अंतिम फेरीत जाणारी सर्वांत तरुण स्पर्धक ठरली. अंतिम फेरीत आपली जागा निश्‍चित केली असून यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्‍नांना उत्तर देताना ती बोलत होती. पुण्यात डेक्कन आयटीएफ टायटल जिंकणे ही तिच्या आयुष्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश असल्याचे तिने यावेळी पत्रकारांना सांगितले.

loading image
go to top