खामोष, अदालत जारी है...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या आणि ५३  वर्षे पूर्ण झालेल्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकाचे हिंदी रूपांतर असलेल्या ‘खामोष, अदालत जारी है’ नाटकाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी पं. नेहरू सभागृहात (घोले रस्ता) स्वतंत्र थिएटरच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले.

पुणे - मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या आणि ५३  वर्षे पूर्ण झालेल्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकाचे हिंदी रूपांतर असलेल्या ‘खामोष, अदालत जारी है’ नाटकाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी पं. नेहरू सभागृहात (घोले रस्ता) स्वतंत्र थिएटरच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विजय तेंडूलकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचे हिंदी रूपांतर सत्यदेव दुबे यांनी केले आहे. स्वतंत्र थिएटरसाठी अभिजित चौधरी यांनी दिग्दर्शन केले. युवराज शहा यांनी निर्मिती केली. लीला बेणारे यांची भूमिका धनश्री हेबळेकर यांनी प्रभावीपणे सादर केली. 

स्त्री पुरुष नातेसंबंध, सामाजिक बंधने, संस्कृती, दांभिकता इत्यादी गोष्टींवर बोट ठेवणारे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षकात तरुणाईचा मोठा सहभाग होता. नाटक संपल्यावर कलाकारांचा सत्कार केला. मनोज ठाकूर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deccan literature festival