जुन्नरकरांना अर्थसंकल्पात दिलासा; करवाढ न करणाचा निर्णय

decision not to raise budget taxes in budget in junnar nagar palika budget
decision not to raise budget taxes in budget in junnar nagar palika budget

जुन्नर  : नगर पालिकेचा शतकोत्तर हीरक महोत्सवी आर्थिक वर्षाचा (सन २०२१- २२) अर्थसंकल्प १८ लाख १२ हजार ६९८ रुपये शिलकीचा विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. त्यात कोविड-१९ या जागतिक महामारीचे संकट असल्याने मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा आणि कोविड–१९ च्या विरोधात उपाययोजना करण्याच्या उद्देशाने विशेष निर्णय घेण्यात आले.

नगरपालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष श्‍याम पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सादर केला होता. या वेळी नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते. या अर्थसंकल्पात शहरातील विकासकामांना गती प्राप्त होण्याकरिता निर्णय घेण्यात आले. नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत माणिकडोह ते जुन्नर शहरापर्यंत पाण्याची पाइप लाइनकरिता सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. नगर पालिका निवडणूक खर्चासाठी विशेष तरतूद केली आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, शहरात वास्तू संग्रहालय उभारणे, विविध ठिकाणी चौक सुशोभीकरण, विद्युत अत्याधुनिकरण करणे, प्रशासकीय इमारत सुसज्ज करण्यासाठी विशेष भरघोस तरतुदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्यावर भर
अर्थसंकल्प प्रामुख्याने आरोग्य विषयास महत्त्व देणारा ठरला. त्यात नागरिकांचे स्वास्थ्य संरक्षण व आरोग्य यावर भर दिला आहे. साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व आकस्मित खर्च, जंतुनाशक फवारणी व उपाययोजना, कचरा व्यवस्थापन, आरोग्य विषयक जनजागृती, शहरातील हवेची गुणवत्तावाढ यावर विशेष भर दिला आहे. नावीन्य उपक्रमाअंतर्गत गॅस शवदाहिनीसाठी विशेष तरतूद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या स्वास्थ्य व आरोग्यास बळकटी आणण्याकरिता भरघोस रक्कमेची तरतूद सर्वानुमते मंजूर केली.

महत्त्वाच्या तरतुदी
- नगरपालिकेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी १५ लाख
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५० लाख
- नावीन्यपूर्ण योजनेतून कुकडी नदी संवर्धनासाठी एक कोटी
- शहरातील रस्त्यांकरिता ३ कोटी
- नगरोत्थान योजनेसाठी ५ कोटी
- स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र करिता ४ कोटी
- महिला व बालकल्याण, दुर्बल घटकातील नागरिक व दिव्यांग नागरिकांकरिता प्रत्येकी १५ लाख

जमा व खर्च

महसुली जमा- १९ कोटी ८८ लाख १ हजार १०० रुपये
भांडवली जमा- ३८ कोटी २३ लाख १० हजार रुपये
एकूण जमा- ५८ कोटी ११ लाख ११ हजार १०० रुपये
महसुली खर्च- १९ कोटी ९० लाख ८६ हजार रुपये
भांडवली खर्च- ४३ कोटी ९६ लाख ९० हजार रुपये
एकूण खर्च- ६४ कोटी ५ लाख ८८ हजार ६९८ रुपये
एकूण शिल्लक- १८ लाख १२ हजार ६९८ रुपये
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com