Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

दिवाळीनंतर पुण्यात लगेच पाणी कपातीत वाढ करून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता होती. मात्र....
water cut

water cut

esakal

Updated on: 

पुणे - दिवाळीनंतर पुण्यात लगेच पाणी कपातीत वाढ करून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता होती. मात्र, आता पाणी कपात लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरासाठी पाटबंधारे विभागाने १३ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे, पण त्यावर महापालिकेसोबत चर्चा केली जावी, असे पत्र पाटबंधारे विभागाला पाठविण्यात येणार आहे. या चर्चेनंतरच पाणी कपात वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.

Loading content, please wait...