जमीन राखणार की सोडणार ?

ॲमेनीटी स्पेसच्या विषयावर गुरुवारी निर्णय
pune
punesakal

पुणे : शहरातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या २६९ ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीने भाड्याने द्यायच्या की नाही यावर उद्या (गुरुवारी) महापालिकेच्या मुख्यसभेत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपने हा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर करणार असल्याचे ठाम पणे सांगितले आहे. काँग्रेस, शिवसेनेची विरोधाची भूमिका कायम आहे. तर राष्ट्रवादीने विरोध केला असला तरी शहरातील पदाधिकाऱ्यांनी अद्याप बैठक झालेली नसल्याने त्यांची भूमिका मुख्यसभेच्यापूर्वी स्पष्ट होणार आहे.

आगामी काळात शहरातील मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्‍यक असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ॲमेनिटी स्पेसच्या जागा ३० वर्ष दीर्घ मुदतीने देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ॲमेनिटी स्पेसच्या १८४ आणि आरक्षणाच्या ८५ अशा एकूण २६९ जागा तीस वर्षासाठी भाड्याने दिल्यास महापालिकेला एकरकमी १७५२ कोटी रुपये मिळतील असे प्रशासनाच्या प्रस्तावात नमूद केले आहे. या सर्व जागा त्वरित भाड्याने जाणार नाहीत, पण पुढील चार-पाच महिन्यात यापैकी किमान मोठ्या जागा भाड्याने गेल्या तरी सुमारे ७०० ते ८०० कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

pune
शेतकऱ्यांवर उभ्या पिकांत मेंढ्या सोडून देण्याची वेळ

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तुम्ही ठरवाल ती भूमिका मान्य आहे, पण जर बहुमताच्या जोरावर भाजपने प्रस्ताव मंजूर केला तर राज्य सरकार हस्तक्षेप करेल असे बैठकीत स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या दोन तीन दिवसात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली नाही. मुख्यसभेच्या पूर्वी आम्हाला पक्ष नेत्यांचा आदेश येईल त्यानुसार भूमिका ठरवली जाईल, असे विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘‘पुण्यामध्ये ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याची गरज नाही, त्यामुले या प्रस्तावाला पूर्वीपासून विरोध आहे, उद्याच्या मुख्यसभेत देखील विरोध केला जाईल.’’

या जागांवर बांधकाम अशक्य - काँग्रेस

या ॲमेनिटी स्पेस एफएसआय, टीडीआरच्या वापरून झालेला असल्याने मोकळ्या जागांवर बांधकाम करता येणार नाही, त्यामुळे जागा भाड्याने दिली तरी तेथे प्रकल्प राबविता .येणार नाही, हे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे. शहरात पार्किंगसाठी जागा नाही, रस्ते पार्किंगसाठी वापरू नये म्हणून उच्च न्यायालयाने ताशेरे मारले आहे, त्यामुळे या जागा पार्किंगसाठी दिल्यास उत्पन्न मिळेल, अशी भूमिका मांडत काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

pune
उपद्रव शुल्क आकारणी नाणेघाटामध्ये बंद : शिंदे

प्रस्ताव आजच मान्य करणार - भाजप

शहरातील विकास प्रकल्प राबविण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पुणेकरांच्या हितासाठी ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीने भाड्याने दिली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मान्य झाला आहे, आता गुरुवारी मुख्यसभेतही त्यास मंजुरी दिली जाईल.’’

- गणेश बीडकर, सभागृहनेते, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com