
पुणे : महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढायची किंवा स्वबळावर याबाबतचा निर्णय पक्षाचे केंद्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाईल. त्यानुसार त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल.कार्यकर्त्यांनी प्रभाग रचना, मतदार नोंदणीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत." असे भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.