विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाने घेतला 'हा' निर्णय

ब्रिजमोहन पाटील
सोमवार, 25 मे 2020

औद्योगीक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व वाढत असताना विद्यार्थ्यांनी पदवी सोबतच हे ऑनर्स कोर्समुळे त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अभियांत्रिकीचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करतात. यामध्ये विशेषतः स्थापत्य शाखेचे विद्यार्थी असता, त्यांना आत्तापासूनच तयारी करता यावी यासाठी 'एमपीएससी', 'यूपीएससी, चा विचार करून अ भ्यासक्रमांमध्ये सुधारणा केल्या आहेत, असे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डाॅ. मनोहर चासकर यांनी सांगितले. 

पुणे : जागतिक औद्योगिक क्रांती '४.ओ' चे देशात पडघम वाजत असताना अभियांत्रिकीच्या पदवीला आधिक रोजगाराभीमूख आणि बदलत्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतरीक्त आता ऑनर्स कोर्स'ची जोड देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थांना क्रेडिट गुण ही मिळणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये अभियांत्रिकीच्या तसेच विज्ञाना शाखेच्या बदललेल्या अभ्यासांना मान्यता देण्यात आली. पुणे विद्यापीठाने गेल्यावर्षी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला क्रेडिट सिस्टीम सुरू केली, यंदा दुसऱ्या वर्षाला लागू झाली आहे. पण या बदलत्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कसे शिक्षण मिळेल याचा विचार केला अाहे. त्यासाठी नियमीत अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांसाठी डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स- मशीन लर्निंग ,सायबर सिक्युरिटी, व्हर्च्युअल रियालिटी हे चार ऑनर्स कोर्स विद्यार्थ्यांना चार वर्षात त्यांच्या सवडीने करावे लागणार आहेत. यासाठी प्रत्येक कोर्सला १६ ते १८ क्रेडिट गुण मिळणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

औद्योगीक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व वाढत असताना विद्यार्थ्यांनी पदवी सोबतच हे ऑनर्स कोर्समुळे त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अभियांत्रिकीचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करतात. यामध्ये विशेषतः स्थापत्य शाखेचे विद्यार्थी असता, त्यांना आत्तापासूनच तयारी करता यावी यासाठी 'एमपीएससी', 'यूपीएससी, चा विचार करून अ भ्यासक्रमांमध्ये सुधारणा केल्या आहेत, असे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डाॅ. मनोहर चासकर यांनी सांगितले. 

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

विज्ञान शाखेत महत्वाचे बदल
वनस्पतीशास्त्र विषयात फ्लोरिकल्चर, भौतिकशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी घरातील  फ्रीज, टीव्ही, गिझर, एसी यासह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शास्त्र शिकवले जाणार आहे. रसायनशास्त्र मध्ये शॉर्ट ऍक्टिव्हिटी आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा अंतर्भाव केला आहे. भूगोल विषयासाठी रिमोट सेन्सिंग ,जीआयएस मॅपिग याचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर थेट प्रात्यक्षिकांमधून शिकता येणार आहे. 

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न

"अभियांत्रिकी व विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अधिक रोजगाराभीमूख बनविने, उद्याेगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करणे याचा विचार करून हा अभ्यासक्रम व ऑनर्स कोर्स सुरू केले आहेत. यामुळे पदवीचा दर्जा ही आणखी चांगला होणार आहे."
- डाॅ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

- पुणे विद्यापीठात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्याचा समावेश 
- १०३ अभियांत्रिकी महाविद्यालये
- विद्यार्थी संख्या सुमारे १.७२लाख
- २४० विज्ञान महाविद्यालये
 -विद्यार्थी संख्या सुमारे ८४ हजार

पुणे विद्यापीठ परीक्षा कशी घेणार यावर शिक्कामोर्तब का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision of Pune University about Addition of Honors Course to Engineering for Job Generation