Captain Swati Mahadik : ‘पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात जाण्याचा निर्णय’

सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन’तर्फे हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि वीर पत्नींचा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड येथे आयोजित केला होता.
Captain Swati Mahadik
Captain Swati Mahadiksakal

कोथरूड - ‘पतीचे निधन हा अनपेक्षित धक्का असतो. आपली पुढची स्वप्ने एका क्षणात संपतात. पतीचे हौतात्म्य स्वीकारून पुढे जाणे ही अवघड प्रक्रिया असते. पतीचे स्वप्न आणि मुलांच्या भवितव्यासाठी मी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला’, असे प्रतिपादन हुतात्मा कर्नल संतोष महाडीक यांच्या पत्नी कॅप्टन स्वाती महाडीक यांनी केले.

सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन’तर्फे हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि वीर पत्नींचा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड येथे आयोजित केला होता. वीरपत्नींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ब्रिगेडियर सुनील बोधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या.

कॅप्टन स्वाती महाडीक, हुतात्मा लेफ्टनंट प्रकाश पाटील यांच्या पत्नी सुवर्णा पाटील, हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्या पत्नी अबोली मोहोरकर, हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, हुतात्मा मेजर जालिंदर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा स्मृतिचिन्ह, साडी, श्रीफळ आणि मानधन देऊन या वेळी सन्मान करण्यात आला.

ब्रिगेडियर सुनील बोधे म्हणाले, ‘सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच त्यांच्या कुटुंबीयांचे धैर्य अतुलनीय असते. सैनिकांच्या वीर मरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी झाले पाहिजे. या कुटुंबीयांना धीर देण्याचा शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनचा उपक्रम दिशादर्शक आहे’.

‘निषाद, पुणे’ निर्मित ‘सात रंग के सपने’ हा मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम चंद्रशेखर महामुनी आणि कल्याणी देशपांडे-जोशी यांनी या वेळी सादर केला. शरदचंद्र पाटणकर, शुभांगी पाटणकर, मेजर महेश तुंगार, अभय शास्त्री, सुजय गोडबोले, रामदास काकडे, सुशील फिरोदिया, दीपक शहा आदी उपस्थित होते. गीता गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. निवेदन पल्लवी देशमुख यांनी केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश राजहंस यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com