esakal | Coronavirus : काळाबाजार रोखण्यासाठी पथके; अन्नधान्य वितरण विभागाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Grains

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, असे राज्य सरकारकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात येत आहे. परंतु, पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरात किरकोळ दुकानदारांकडून ग्राहकांना त्यांनी केलेल्या मागणी पेक्षा निम्म्याने धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी किरकोळ किराणा माल व्यापारी या वस्तूंची चढ्या दराने विक्री देखील करत असल्याचे दिसून येत आहे.

Coronavirus : काळाबाजार रोखण्यासाठी पथके; अन्नधान्य वितरण विभागाचा निर्णय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने पथके स्थापन केली आहेत. ११ पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, असे राज्य सरकारकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात येत आहे. परंतु, पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरात किरकोळ दुकानदारांकडून ग्राहकांना त्यांनी केलेल्या मागणी पेक्षा निम्म्याने धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू दिल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी किरकोळ किराणा माल व्यापारी या वस्तूंची चढ्या दराने विक्री देखील करत असल्याचे दिसून येत आहे. 

हे लक्षात घेऊन शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने प्रत्येक परिमंडळ निहाय पथके स्थापन केली आहेत. 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, "सद्यस्थितीत अन्नधान्य, भाजीपाला, दूध, औषधे यांची एकूण २७ हजार २१० दुकाने सुरळीत पणे चालू आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही यासाठी बाजार समिती, घाऊक व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन, व्यापारी महासंघ यांच्या शी समन्वय साधला जात असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल याची दक्षता घेतली जात आहे. काही जिल्हा आणि राज्याबाहेरील जीवनावश्यक वस्तूंची वाहने पोलिसांकडून अडविली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु, मंगळवारी ९२ गाड्यांची आवक झाली. "

पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा
लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल आणि डिझेल यांची टंचाई भासू नये यासाठीयासाठी या काळात केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल चा साठा राखीव ठेवला जावा, असे पेट्रोलियम कंपन्यांना कळविण्यात आले आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला आेळखपत्रे दिली जात आहेत. आतापर्यंत  विविध प्रकारच्या आस्थापनांना ४ हजार ९६ आेळखपत्रे देण्यात आली आहेत.